ओंकार स्वरूपा सदगुरु समर्था (Omkar Swarupa Sadguru Samartha)

ओंकार स्वरूपा सदगुरु समर्था
अनाथाच्या नाथा तुज नमो॥ धृ ॥

नमो मायबापा गुरु कृपाघना
तोडी या बंधना मायामोहा
मोहोजाल माझे कोण निरशील
तुजविण दयाला सदगुरुराया॥ 1 ॥

सदगुरु राया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र, रवी
रवी, शशी, अग्नी नेणती ज्या रुपा
स्वप्रकाश रुपा नेणे वेद ॥ 2 ॥

एका जनार्दनी गुरु परब्रम्ह
तयाचे पै नाम सदा मुखी ॥ 3 ॥